Hosea 4

1इस्राएलाच्या लोकांनो, परमेश्वराचा शब्द ऐका
या देशातील लोकांविरुध्द परमेश्वराचा वाद आहे
कारण या देशामध्ये सत्यता किंवा करारबध्द विश्वासूपणा, देवाचे ज्ञान नाही.
2तर येथे शाप देणे, लबाड बोलणे, जिव घेणे, चोरी करणे आणि व्यभिचार करणे आहे.
या लोकांनी सर्व नियम मोडले आहेत व इथे रक्तपातानंतर रक्तपात होत आहे.

3म्हणून ही भूमी कोरडी पडत आहे,

जो कोणी येथे राहतो तो नाश पावत आहे,
रानपशू, आकाशातील पाखरे,
समुद्रातील मासेही नाही तसे होत आहेत.

4पण कुणालाही वाद घालू देऊ नका,

कोणीही कोणावर आरोप न लावो,
कारण माझे लोक याजकांशी वाद करतात त्यांच्यासारखे आहेत.
5आणि तू दिवसा अडखळून पडशील आणि तुझ्यासुद्धा
भविष्यवादीही रात्री अडखळून पडेल;
आणि मी तुझ्या आईचा नाश करेन.

6माझे लोक ज्ञान नसल्याने नाश पावत आहेत.

कारण तुम्ही ज्ञानास नाकारले म्हणून
मी सुध्दा तुम्हाला माझे याजक म्हणून नाकारीन.
माझे, तुमच्या देवाचे नियमशास्त्र
तुम्ही विसरलात म्हणून मी ही तुमच्या मुलांना विसरेन.
7जसे हे याजक वाढत गेले
तसे ते माझ्या विरोधात पाप करत गेले.
मी त्यांचा सन्मान लाजेमध्ये बदलून टाकीन.

8ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात.

त्यांच्या दुष्टतेकडे त्याने मन लागलेले आहे.
9आणि जसे लोक तसा याजक असे होईल,
आणि मी त्यांच्या आचरणामुळे त्यांना शासन करीन,
आणि त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ देईन.

10ते खातील पण ते त्यास पुरणार नाही

ते व्यभिचार करतील पण त्यांची वाढ होणार नाही
कारण ते आपला देव, परमेश्वर, यापासून खूप दूर गेले आहेत.

11वेश्यागमन, द्राक्षारस, आणि नवा द्राक्षारस यांनी त्यांचा विवेक काढून घेतला आहे.

12माझे लोक त्यांच्या लाकडी मुर्तीचा सल्ला घेतात,
त्यांच्या काठ्या त्यांना भविष्य सांगतात.
गुंतागुंतीच्या आत्म्याने त्यांना बहकवले आहे,
आणि त्यांनी माझा त्यांच्या परमेश्वराचा त्याग केला आहे.

13ते पर्वतांच्या शिखरावर बलिदान करतात

आणि टेकडयांवर धूप जाळतात,
ओक, हिवर, आणि धूप जाळतात,
कारण त्यांची सावली चांगली (छान) असते;
म्हणून तुमच्या मुली जारकर्म करतात
व सुना व्यभिचार करतात.
14तुमच्या मुली जारकर्म करतात व सुना व्यभिचार करतात
तेव्हा मी त्यांना शासन करणार नाही कारण पुरुष स्वत: वेश्येकडे वेगळे होऊन जातात,
आणि कलावंतिणींबरोबर यज्ञ करतात;
हे विवेक हिन लोक आहेत, ते पावतील.

15हे इस्राएला जरी तू व्यभिचार केला आहेस,

तरी यहूदा दोषी न होवो; तुम्ही लोकहो,
गिल्गालास जाऊ नका,
वर बेथ अवेनास जाऊ नका,
परमेश्वरांच्या जिविताची शपथ वाहू नका.
16कारण इस्राएल हट्टी कालवडी सारखा हट्टी वागला आहे.
मग परमेश्वर त्यास कोकरे जसे कुरणात चरतात तसा गायरानात कसा आणणार?

17एफ्राईम मुर्तीसोबत एक झाला आहे

त्याला एकटे सोडा.
18त्यांचा द्राक्षारस आंबट झाला आहे;
ते एकसारखे व्यभिचार करतच राहतात.
तिच्या अधिकाऱ्यास अप्रतिष्ठा अतिप्रिय आहे.
वारा आपल्या पंखात तिला लपेटून नेईन,
आणि ते आपल्या बलिदानांमुळे लज्जित होतील.
19

Copyright information for MarULB